¡Sorpréndeme!

Ambedkar Jayanti 2022 | तीन हजार पुस्तके वापरत साकारली बाबासाहेबांची प्रतिकृती | Sakal Media

2022-04-14 127 Dailymotion

१४ एप्रिल अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. पुस्तकांसाठी भव्य असं घर बांधणाऱ्या या महामानवाने अवघ आयुष्य पुस्तक लिहिण्यात अन वाचनात खर्ची केलं अन देशाला एक परिपूर्ण असं संविधान दिलं. 'वाचाल तर वाचाल' हा संदेश देत त्यांनी समाजाला वाचनाची प्रेरणा दिली. हाच धागा पकडत यंदाच्या जयंतीनिमित्त तब्बल तीन हजार पुस्तकांचा वापर करत साडेपाच हजार चौरस फुट शालेय मैदानात बाबासाहेबांची आकर्षक प्रतिकृती साकारत देव हिरे यांनी महामानवास अनोखं अभिवादन केलं आहे. हिरे यांनी ही कलाकृती दोन दिवसांत तब्बल बारा तास भर उन्हात उभं राहत आपली कलाकृती पूर्णत्वास नेली. यात तीन हजार पुस्तकांचा वापर झाला असून विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करत 'वाचाल तर वाचाल' हा संदेश देखील दिला आहे.